Archive for किंगफिशर एअरलाइन्स

किंगफिशरच्या पायलटांची वेतनकपात

म. टा. प्रतिनिधी

किंगफिशर एअरलाइन्सने पायलटच्या पगारात ८० हजार रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूवीर् पायलटना महिन्याला साडेचार लाख रुपये इतका पगार मिळत होता. आता तो ३ लाख ५० हजार रुपये करण्यात आला आहे, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका पायलटने दिली. पगार कपातीबरोबरच पायलटचे कामाचे तासही कमी होतील, असे याबाबत बोलताना एअरलाइन्सचे प्रवक्ते म्हणाले.

Leave a comment »