Archive for नवरा आणि बायको -Funny quarrel dialogs

नवरा आणि बायकोच्या भांडणाचे dialogs -Funny quarrel dialogs

नवरा आणि बायकोच्या भांडणाचे dialogs -Funny quarrel dialogs

वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना, काय उदगार काढतील..?
पायलटची बायको … " गेलास उडत…"
मंत्र्याची बायको … " पुरे झाली तुमची आश्वासनं."
शिक्षकाची बायको … " मला नका शिकवू…"
रंगारयाची बायको … " थोबाड रंगवीन."
धोब्याची बायको … " चांगली धुलाइ करीन."
सुताराची बायको … " ठोकुन सरळ करीन."
तेल विक्रेत्याची बायको … " गेलात तेल लावत."
न्हाव्याची बायको … " केसाने गळा काप्लात की हो माझा."
डेंटिसची बायको … " दात तोडुन हातात देइन."
शिंप्याची बायको … " मल शिवलंस तर याद राख."
अभिनेत्याची बायको … " कशाला नाटक करता?"
वाण्याची बायको … " नुसत्या पुड्या सोडु नका "
रेल्वे ड्रायव्हरची बायको…. " आली का गाडी रुळावर/लायनीवर ?"
संगणक अभियंत्याची बायको….. " तुला डिलीट करून टाकीन

funny marathi joke

मुलगा मुलीच्या घरी तिला ‘पाहायला’ गेला आहे. आजकालच्या प्रथेप्रमाणे वडीलधारे त्या दोघांना ‘एकटे’ सोडतात.)
मुलगी : तुम्ही काय करता?
मुलगा (मिष्कील स्वरात) : आंघोळ!!!! (आता प्रश्ान् विचारण्याची त्याची पाळी. तो विचारतो…) तुम्हाला काय येतं?
मुलगी (मिष्कीलपणे) : घाम!!!!
मुलगा (चपापतो, सावरतो) : अं, ते जाऊ दे. तुम्हाला गाता येते का?
मुलगी : हो….
मुलगा : मग गाऊन दाखवा ना!
मुलगी : बाहेर वाळत घातलाय!!!!!
मुलगा (आता पुरता फ्लॅट होऊन, कसाबसा) : वाळू दे, वाळू दे!
( मुलगी आत जाऊन मूठभर वाळू आणून त्याच्या हातात देते आणि तो बेशुद्ध पडतो….)

Leave a comment »