Archive for रेल्वे नोकरभरती अध्यक्षांच्या अधिकारांना कात्री

रेल्वे नोकरभरती अध्यक्षांच्या अधिकारांना कात्री

रेल्वे नोकरभरती अध्यक्षांच्या अधिकारांना कात्री

नवी दिल्ली – रेल्वेतील नोकर भरती प्रकरणी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर हतबुद्ध झालेल्या रेल्वे मंत्रालयाने, रेल्वे नोकर भरती मंडळाच्या अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय प्रश्नपत्रिका फुटीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात येणार आहेत.

या संदर्भात बोलताना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विवेक सहाय म्हणाले, की नोकर भरती मंडळाच्या अध्यक्षांना अवास्तव अधिकार दिले आहेत. त्यांना प्रत्येक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळता कामा नये. त्यामुळेच परीक्षा पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच आवश्यक ती पावले उचलण्यात येतील.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गेल्या १९ जून रोजी रेल्वे नोकरभरतीतील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी मुंबईच्या रेल्वे नोकर भरती मंडळाचे अध्यक्ष एस. एम. शर्मा यांचा मुलगा विवेक शर्मा आणि रायपूरचे ए. के. जगन्नाथम व त्यांचा मुलगा सृजन यांच्यासह आठ जणांना अटक केली. या प्रकरणानंतर शर्मा आणि जगन्नाथम यांना निलंबित करण्यात आले. ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली होती, तेच लोक फितूर निघतील असे वाटले नव्हते, अशी कडवट प्रतिक्रियाही सहाय यांनी व्यक्त केली.

प्रश्नपत्रिकेतील प्रश्न निवडण्याची प्रक्रियाही बदलण्याबाबत विचार चालू आहे, असे सांगून सहाय म्हणाले, की सध्या प्रत्येक नोकर भरती मंडळ स्वतःचीच प्रश्नपत्रिका तयार करत होती. आता विचार चालू असलेल्या नव्या संभाव्य पद्धतीमध्ये, ती अधिक पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. एखाद्या केंद्रात प्रश्नपत्रिका फुटली, तरी त्याचा दुस-या केंद्रावर परिणाम होणार नाही.

प्रशासकीय आणि कार्यक्षमतेमुळे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशभरात एकूण २१ जणांची रेल्वे नोकर भरती मंडळावर अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. असा प्रकार घडल्याबद्दल सहाय यांनी खेद व्यक्त केला.

———————————————-

प्रतिक्रिया

On 6/22/2010 7:16 PM उर्मिला अशोक शहा said:

जगातील दुसर्या क्रमांकाची रेल्वे पण साठ वर्षा पासून कॉंग्रेसच्या जोखडात.कारण येथे भरपूर "वाव" आहे त्याला सनदी अधिकार्यांच्या ताब्यात का देत नाही म्हणजे निदान गैप्रकाराचा जवाब मागता येईल.प्रामाणिक राज्य करते लोकांच्या सोयीचा गैरसोईचा विचार करतात आमचे राज्य करते स्वताच्या.इतकी मोठी आर्थिक उलाढाल पण केंद्रातील अपात्र मंत्र्याचा हातात मन मानेल तसा कारभार आणि सगळीकडे अव्यवस्था नोकर भारती मंत्र्यच्या मर्जीवर,लहरीवर स्वक्षेत्रातील लोकांचा भरणा पात्रतेचा विचार राम भरोसे एकविसाव्या शतकात भ्रष्ट मानाकन

On 6/22/2010 6:12 PM vikas mane said:

"भ्रष्टाचार" म्हणजे भारताचा प्रत्येक नेता

On 6/22/2010 5:59 PM potya said:

जलसंपदा तील भ्रष्टाचार असाच बाहेर काढा. सर्व अभियंते अतिशय भ्रष्टाचारी आहेत.

On 6/22/2010 5:34 PM you can said:

काही उपयोग नाही…. महाराष्ट्राची वाताच लागणार आहे….

Leave a comment »