Archive for Terror Attack

Mumbai under terror Attack

“Saihdaokao laala salaama”

NRMU condemns the Mumbai Mindless Terror Attack…

480

बॉडी बिल्डर, पॉवर लिफ्टर अशोक कामटे

मुंबई पोलिस दलाच्या पुर्व प्रादेशिक विभागाच्या अतिरिक्त पदावर कार्यरत असणारे अशोक कामटे आयपीएस अधिकारी होते. सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदावर उल्लेखनीय कामगिरी बजावल्यानंतर कामटे यांची नुकतीच मुंबई पोलिस दलात बदली झाली होती.
वीर अधिकारी…
श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे क्‍लिक करा…

ठाणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक म्हणूनही कामटे यांचा कार्यकाळही चांगलाच गाजला.खेळाची आवड असलेले कामटे पॉवर लिफ्टर आणि बॉडी बिल्डर म्हणूनही प्रसिद्ध होते.त्यांच्या नावावर पॉवर लिफ्टींगमधील तीन राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. मुंबईवर काल रात्री झालेल्या अतिरेकी हल्ल्यात कामटे अतिरेक्‍यांच्या गोळीबारात शहीद झाले.

 

पोलिस दलाचा चेहरामोहरा बदलण्यात अग्रभागी

मुंबई – हेमंत करकरे १९८२ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी. राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुख पदावर कार्यरत होते. देशातील काही निवडक आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक.
वीर अधिकारी…श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे क्‍लिक करा…
"रॉ’ मध्ये अनेक वर्ष उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर २००७ मध्ये मुंबई पोलिस दलात परतलेले करकरे पोलिस सहआयुक्त (प्रशासन) या पदावर रुजू झाले. "रॉ’ मधील अनेक वर्षांच्या कामाचा अनुभव आणि गुप्तहेरांचे देशव्यापी नेटवर्क असल्याने त्यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकावर नियुक्ती करण्यात आली.
मालेगाव बॉम्बस्फोटानंतर हिंदुत्ववादी संघटनांचा बॉम्बस्फोटांसारख्या कृत्यातील सहभाग उघडकीस आणणारा हा अधिकारी बुधवारी मध्यरात्री ताज हॉटेलमध्ये अतिरेक्‍यांसोबत लढताना धारातीर्थी पडला. राज्य पोलिस दलाचा चेहरा बदलून त्याचे आधुनिकीकरण करण्यात करकरे यांची कामगिरी मोलाची आहे.

 

गुन्हेगारी विश्‍वाचे कंबरडे मोडणारा अधिकारी

मुंबई – मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून दबदबा असलेला अधिकारी म्हणून विजय साळसकर परिचित होते. मुंबईच्या गुन्हेगारी विश्‍वाचे कंबरडे मोडणाऱ्या या अधिकाऱ्याने आतापर्यंत ७८ हून अधिक सराईत गुन्हेगारांचा खातमा केला.
वीर अधिकारी…श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे क्‍लिक करा…
१९८३ च्या बॅचचे पोलिस अधिकारी असलेले साळसकर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख पदावर होते.
मुंबई पोलिस दलात साळसकर यांच्या चोवीस वर्षांच्या सेवेत त्यांनी अमर नाईक, साधु शेट्टी, जग्गू शेट्टी, कुंदन सिंग रावत, जहूर मसंदा, सदा पावले, विजय तांडेल सारख्या सराईत गुन्हेगारांना यमसदनी धाडले. मेट्रो सिनेमाजवळ अतिरेक्‍यांशी मुकाबला करताना साळसकर धारातीर्थी पडले.

मुंबई – माहिती आणि मदतीसाठी

"सोशल मीडिया’चा मोठा वापर

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर ब्लॉगर्स आणि सर्वसामान्य नागरीकांनी माहिती देण्यासाठी आणि मदतीच्या याचनेसाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केलेला दिसून आला.
ट्‌विटर या मायक्रोब्लॉगींग सेवेवर Mumbai आणि #Mumbai या टॅगवर काल रात्रीपासून हजारो अपडेट्स दिली गेली. यात ताज्या घडामोडी, मृत आणि जखमींची संख्या, रक्तदानासंबंधीची आवाहने, हॉस्पीटल्स, हॉटेल्सचे हेल्पलाईन क्रमांक आदी माहितीचा समावेश होता. आज सकाळपासून @mumbaiattack अशा नावाने स्वतंत्र ट्विटर अकाऊंटही सुरू झाले आहे.
www.twitter.com

महालो आणि नाऊ पब्लिक या सिटीजन जर्नलिझम साईटवर नागरिकांनी लिहिलेल्या बातम्यांचा समावेश आहे. नाऊ पब्लिकच्या होम पेजवर हल्ल्याशी संबंधित बातम्या, छायाचित्रे आणि व्हिडीओ आहेत.
http://www.mahalo.com/Mumb ai_Terrorist_Attacks
http://www.nowpublic.com/

मुंबई हेल्प या ब्लॉगवर कॅन वुई हेल्प या नावाने सुरू झालेल्या पोस्टवर मुंबईकरांची मदतीची भावना दिसून येते. ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकित हॉटेल्समध्ये अडकलेल्या परदेशी नागरिकांशी संपर्क साधण्यात ते मदत करत होते. नरिमन हाऊसमध्ये ओलिस ठेवलेल्या कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्या इसराईलमधील नातेवाईकांनी या ब्लॉगचा आधार घेतला.
http://mumbaihelp.blogspot.com

विनूकुमार रंगनाथन हा कुलाब्यात राहणारा तरुण पहिल्या बातमीनंतर केवळ १५ मिनिटात घटनास्थळी पोचला. त्याने काढलेली छायाचित्रे फ्लिकरवर अपलोड केली. फॉक्स न्यूजने मुंबई हल्ल्याशी संबंधित बातमीत विनूकुमारच्या फ्लिकरवरील फोटोस्ट्रीमची लिंक दिली आहे.
http://flickr.com/photos/vinu/
ग्लोबल व्हॉईसेस ऑनलाईन या साईटवर नेहा विश्वनाथनने हल्ल्यासंबंधित बातम्यांची मालिका सुरू केली आहे.
http://globalvoicesonline.org/

Leave a comment »